Monday, January 23, 2006

सु-दर्शन महोत्सवात माझ्या हास्य कविता

पुण्यातील सु-दर्शन सभागृहात सध्या विविध प्रकारच्या नाट्य आविष्कारांचा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवा अंतर्गत रोजच्या मुख्य नाट्य आविष्कारा आधी २० मिनिटांचा एक अनौपचारिक कला आविष्कार सुदर्शन कट्टा या नावाने आयोजित केला जात आहे.

सुदर्शन कट्ट्यावर उद्या, दि. २४ जाने ०६ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता माझ्या हास्य कवितांचा एक छोटासा कार्यक्रम सादर करणार आहे. या कट्ट्यासाठी सर्वांना सस्नेह निमंत्रण!

कार्यक्रमाचा तपशील
सुदर्शन कट्टा: मराठी हास्य कविता

सादरकर्ता: प्रसाद शिरगांवकर
वेळ: साय ६.३०
स्थळ: सुदर्शन रंगमंच, अहिल्यादेवी प्रशालेजवळ, शनिवार पेठ, पुणे ३०
कार्यक्रमाचा कालावधी सुमारे २० मिनिटे

(उद्याचा मुख्य नाट्य आविष्कार: 'नकाब' नावाचे उर्दू नाटक, सायं ७ वाजता, या मुख्य आविष्कारासाठी देणगी प्रवेशिका असण्याची शक्यता आहे)

आनंदाच्या गावाविषयी...

'आनंदाचं गांव' तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यात घडण्यार्‍या साध्या साध्या घटनांवरच्या हलक्या फुलक्या कवितांचा कार्यक्रम... 2002 पासून मी हा कार्यक्रम करत आहे. आजवर याचे पुणे आणि लंडन येथे अनेक प्रयोग झाले आहेत.

या कार्यक्रमाच्या प्रयोगांविषयी माहिती देण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ही जालनिशी!